कुडाळ :
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग येथे सात एप्रिल 2022 या दिवशी वर्ल्ड हेल्थ दिवस म्हणजेच जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. थोर संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षातील साजरा केलेला हा आरोग्य दिवस विशेष लक्षणीय ठरला.
महाविद्यालयांतर्गत पोस्टर बनवण्याची स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेऊन यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिवसाच्या थीम वर ‘आपली पृथ्वी आपले आरोग्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करण्यात आले. बीएससी नर्सिंग जी एन एम एन एम अशा सर्व वैद्यकीय शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेऊन आजच्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.
नव्याने सुरू झालेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनीही सदर दिवस साजरा करत जागतिक आरोग्य दिवसाचे औचित्य साजरे केले. आरोग्य विषयक संदेश देणारे एकूण १३ पोस्टर्स आणि बारा रांगोळ्या साकार झाल्या. अत्यंत प्रदर्शनीय आणि आरोग्य विषयासंदर्भात विचार करायला भाग पाडणारे वैविध्यपूर्ण असे हे प्रदर्शन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या इतर विभागातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना प्रबोधित करत होते.
याकामी प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी,प्रा. वैशाली ओटवणेकर ,पियुषा प्रभूतेंडोलकर,प्रा.वैजयंती नर,प्रा. पल्लवी हरकुळकर,प्रा. प्रियंका माळकर,प्रा. रेश्मा कोचरेकर,प्रा. गौतमी माईनकर,प्रा. नेहा महाले,प्रा. ऋग्वेदा राऊळ ,प्रसाद कानडे, योगेश येरम यांचे विशेष सहकार्य लाभले