जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. संजीवनी तोफखाने यांची अप्रतिम काव्यरचना
या मनीच्या वादळाला सांग कैसे थोपवावे
या जगाच्या रे विनाशा सांग कैसे थोपवावे
बुद्धिवादी ज्ञातकांची ओढ आहे जी विदेशी
चाललेल्या लेकरांना सांग कैसे थोपवावे
ढाळताना जीर्ण पाने पालवीला वॄक्ष बोले
जाळणाऱ्या वेदनेला सांग कैसे थोपवावे
गोड पाणी या नद्यांचे सागराने खारटावे
पावसाच्या पाणियाला सांग कैसे थोपवावे
लवजिहादी सूप्त हल्ले, कारनामे चाललेले
मूर्ख ऐशा कारट्यांना सांग कैसे थोपवावे
स्त्रीसुरक्षा आज नाही पाहती ना बालवॄध्दा
आसुरी या वासनांधा सांग कैसे थोपवावे
लेखणीला धार नाही शब्दपुष्पे सांडते ती
सांडणाऱ्या पारिजाता सांग कैसे थोपवावे
संस्कॄतीची, मायभूची राहिली ना चाड कोणा
बेलगामी वागण्याला सांग कैसे थोपवावे
डॉ. संजीवनी तोफखाने