*ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इरा*
इरा आमची लाडाची ग लाडाची
आजी आबांची सोनुली ती पंखुडी
मामा मामीची पेढा काजूकतली
काका काकूची परी मोठ्या गुणाची
हेरंब दादाची ती सोनपुतळी
देखणी हुशार बुध्दीमान खरी
नृत्य, चित्रकला आवडते भारी
बोलकी, लाघवी संवेदनशील
रूद्र ची ताई अतिशय प्रेमळ
म्हणे आबांची होईन काठी तरी
आई बाबांची असे ती अभिमान
कुमठेकर कुटुंबा बहुमान
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
द्वारा डॉक्टर साई प्रसाद कुमठेकर
अनिका पिकॅडिली
ए-५०३
पुनावळे बाजार, पुनावळे पुणे- ४११०३३