You are currently viewing सिंधुदुर्ग देवगड येथील मूळ रहिवासी सध्या डोंबिवली मुंबई येथे राहणारा अक्षय मोगरकर याने जिंकली प्रतिष्ठेची “महाराष्ट्र श्री” 2022 शरीरसौष्ठव स्पर्धा

सिंधुदुर्ग देवगड येथील मूळ रहिवासी सध्या डोंबिवली मुंबई येथे राहणारा अक्षय मोगरकर याने जिंकली प्रतिष्ठेची “महाराष्ट्र श्री” 2022 शरीरसौष्ठव स्पर्धा

पुणे बालेवाडी येथे 15 ते 19 एप्रिल दरम्यान होणाऱ्या मि.युनिव्हर्स आणि मि. इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ठरला पात्र

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे ती मूळ देवगड येथील व सध्या मुंबई, डोंबिवली येथे राहणारा शरीरसौष्ठवपटू अक्षय मोगरकर यांने. सर्वसामान्य कुटुंबातील अक्षय मोगरकरसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा म्हणजे अत्यंत कठीण अशीच गोष्ट आहे. शरीरसौष्ठव सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खरतर प्रयत्नांबरोबरच आर्थिक परिस्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. सर्व खडतर परिस्थितीवर मात करत अक्षय मोगरकर याने दुसऱ्यांदा “महाराष्ट्र श्री” हा किताब पटकावला आहे. 6 एप्रिल 2022 रोजी झालेली “महाराष्ट्र श्री” ही स्पर्धा अत्यंत कठीण होती. एकूण आठ वजनी गटांमध्ये ही स्पर्धा खेळली गेली होती. यातील 85+ किलोग्रॅम वरील वजनी गटामध्ये अक्षय मोगरकर याने भाग घेतला होता. चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये अक्षय मोगरकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत 2022 चा टायटल विनर बनला. 2016 मध्ये देखील अक्षय मोगरकर याने “महाराष्ट्र श्री टायटल विनर” म्हणून स्पर्धा जिंकली होती.
अक्षय मोगरकर हा यापूर्वी 2016/17 सालात झालेल्या “मिस्टर इंडिया” स्पर्धेचा विजेता ठरला होता. त्यानंतर 2016/17 मधील “फेडरेशन कप”, “मिस्टर ठाणे” स्पर्धेतही विजेता होता. 2018 मध्ये झालेल्या “मिस्टर आशिया” स्पर्धेत त्याने सिल्वर मेडल प्राप्त केलं होतं. 15 ते 19 एप्रिल 2022 पासून बालेवाडी पुणे येथे रंगणाऱ्या “मिस्टर युनिव्हर्स” आणि “मिस्टर इंडिया” चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी अक्षय मोगरकर याला नामांकन मिळाले आहे. आजपर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे अक्षय मोगरकर याला पुणे येथे होणाऱ्या “मिस्टर युनिव्हर्स” आणि “मिस्टर इंडिया” या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविण्याची पूर्ण खात्री आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू भाग घेत असतात. तरीही आपल्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्यावरच अक्षय मोगरकर याने लक्ष केंद्रित केलेले आहे. आपल्या भारत देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी करण्याची अक्षय मोगरकर यांची प्रामाणिक इच्छा आहे.
मुंबई डोंबिवली येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला अक्षय आणि त्याचे कुटुंब यांना अक्षयला स्पर्धेला तयार करण्यासाठी लागणारे डायट, न्यूट्रिशन, मल्टीविटामिन, मायक्रो न्यूट्रीयंटस इत्यादीसाठी येणारा खर्च हा पेलवणारा नाही. त्याच प्रमाणे प्रत्येक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी असणारी प्रवेश फी ही प्रत्येक शरीरसौष्ठवपटूनेच भरायची असते, आणि ती देखील प्रमाणापेक्षा जास्तच असते. त्यामुळे स्पर्धेसाठी उतरताना अक्षय मोगरकर याला प्रत्येक स्पर्धेला 80 ते 90 हजाराचा खर्च येतो. आपल्या देशासाठी अतुलनीय कामगिरी करण्याची आशा असणारा अक्षय याला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावून मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. अक्षयचा आजपर्यंतचा स्पर्धांमधील प्रवास पाहिला असता, भविष्यात नक्कीच अक्षय मोगरकर भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसेल. अक्षय मोगरकर याला येणाऱ्या 15 ते 19 एप्रिल दरम्यान पुणे बालेवाडी येथील “मिस्टर युनिव्हर्स” आणि “मिस्टर इंडिया” स्पर्धेसाठी आपण सर्वांनी शक्य ती आर्थिक मदत करून सहकार्य करावे,अशी अक्षय व त्याच्या कुटुंबीयांनी अशा व्यक्त केली आहे.

अक्षय मोगरकर याचे बँक डिटेल्स खालील प्रमाणे:-
अक्षय रवींद्र मोगरकर,
कॅनरा बँक, शाखा- डोंबिवली, मुंबई
खाते क्रमांक:- 1100 31 70 99 61
आय एफ एस सी कोड:- CNRB0000249

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =