You are currently viewing भाजपा बांदा मंडला तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांचा ७० व्या वाढदिवसानिमित्त बांदा रुग्णालयात फळे वाटप 

भाजपा बांदा मंडला तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांचा ७० व्या वाढदिवसानिमित्त बांदा रुग्णालयात फळे वाटप 

कोकण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि राज्यासह केंद्राच्या राजकारणात दबदबा असलेले माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नेहमी कोकणवर आणि विशेषतः सिंधुदुर्गवर खूप प्रेम केले आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आर्थिक सुबत्ता झाली पाहिजे. आणि सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. यासाठी नेहमी झटणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील लोकांसाठी हक्काचे दादा म्हणून त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. “अरे ला कारे” करण्याबरोबर प्रसंगी अत्यंत हळव्या स्वभावाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करणाऱ्या श्री. राणेंची ताकद खूप मोठी आहे. विरोधकांना पुरून उरत त्यांनी राजकारणात, समाजकारणात आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. अशा या आगळ्यावेगळ्या नेतृत्वाचा ७० वा वाढदिवस आज होत आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त बांदा रुग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम केला.
त्यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा हॉस्पिटल चे डॉ.पाटील, उपसभापती शितल राऊळ, सरचिटणीस मधुकर देसाई, मंडल उपाध्यक्ष बाळू ऊर्फ राजाराम सावंत, युवा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब,शहर अध्यक्ष राजा सावंत, किसान मोर्चा अध्यक्ष प्रविण देसाई, बांदा सरपंच आक्रम खान, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, माजी सभापती भगवान देसाई, युवा बांदा मंडल उपाध्यक्ष विनेश गवस, महिला शहर अध्यक्षा सौ.अवंती पंडित, युवा बांदा शहर अध्यक्ष साईनाथ सावंत, माजी सरपंच दीपक सावंत, बाबा गाड, हुसेन मकानदार, अरुण देसाई, सौ.राखी कळंगुटकर, सौ.लक्ष्मी सावंत, सौ.अंकिता देसाई, सौ.तनुजा वाराडकर, बूथ अध्यक्ष रत्नाकर आगलावे, बाळू सावंत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
➖️➖️➖️➖️➖️🌹➖️➖️➖️➖️➖️

प्रतिक्रिया व्यक्त करा