You are currently viewing सालईवाडा येथील बेबी कोळेकर यांच्या कुटूंबाला मदत

सालईवाडा येथील बेबी कोळेकर यांच्या कुटूंबाला मदत

अन्नधान्य, ताडपत्री व आर्थिक मदत केली :केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीर आडीवरेकर यांचा उपक्रम

सावंतवाडी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर व संजू शिरोडकर यांच्या माध्यमातून सालईवडा येथील बेबी रामा कोळेकर या कुटुंबाला अन्नधान्य, ताडपत्री व आर्थिक मदत करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्या कुटूंबाने सर्वांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, माजी नगरसेवक उदय नाईक माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर, माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, बांदा मंडळ ज्ञानदीप सावंत, अमित गवंडळकर, मिस्भा शेख, मंदार नार्वेकर, गोविंद शिरसाट आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा