कणकवली शहरात नगरपंचायत ने उभारला सेल्फी पॉइंट
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले उदघाटन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन काढला सेल्फी
कणकवली :
कणकवली नगरपंचायत तर्फे कणकवली नरडवे मार्गावरील उपजिल्हा रुग्णालय नजीक उभारण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटचा लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. आम.राणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी एकमेकांस समवेत सेल्फी देखील घेतले तर नगराध्यक्ष समीर नलावडे व आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये ऐतिहासिक बदल सुरू असल्याचे कौतुकोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले.
या प्रसंगी माजी जिप अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सभापती संजय कामतेकर, ऍड. विराज भोसले भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक अभिजीत मुसळे,अबिद नाईक, शिशीर परुळेकर, रवींद्र गायकवाड,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे,अण्णा कोदे,प्रतीक्षा सावंत,कविता राणे,किशोर राणे ,माजी नगरसेविका राजश्री धुमाळे संजीवनी पवार,प्राची कर्पे,संजना सदडेकर,बंडू गांगण,संदीप मेस्त्री,मनोहर पालयेकर,रमेश जोगळे,संदीप राणे, हेमंत सावंत,राजू चिंदरकर,आदी उपस्थित होते.
आम. नितेश राणे पुढे म्हणाले,आतापर्यंत कधीच झाली नाही अशी कामे नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हरणे व आमचे नगरसेवकांची टीम प्रामाणिकपणे करत आहेत.सदरचा सेल्फी पॉइंट नाही शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरात दर्जेदार कामे झाली यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उभे राहिले गार्डन चे काम सुरू झाले आहे कणकवली शहराला जिल्ह्यात राज्यात नावलौकिक मिळवून देण्याचे काम नलावडे व त्यांचे सहकारी करीत आहेत असे कौतुकोद्गार त्यांनी काढले