जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री सौ.आशा भावसार यांची अप्रतिम काव्यरचना
लागता चाहूल
रणरणत्या उन्हाची
गोड शहाळी, रस
अन् थंडगार पन्ह्याची//
मज्जा भारी
उन्हाळ्याच्या खेळाची
मधेच आठवण
बर्फाच्या गोळ्याची//
आंबा,फणस, कैरी
अन् चिंच थोडी
रानचा मेवा खाण्याची
वेगळीच गोडी //
दही,लस्सी,ताक
अन् लिंबू पाणी
रोज रात्री आजी
सांगे गोष्टी कानी//
चैत्रगौरी घेऊन येते
फराळाची वाटी
एकाच पानात
खाण्याची होते दाटी//
मामा आणतो
टरबूज आणि करवंद
मम्मी देते सर्वांना
थंड थंड गुलकंद//
आजोळीच्या रात्रीची
तर गंमतच न्यारी
सगळ्यांच्या गोष्टी
रंगतात खूपच भारी//
सौ आशा सचिन भावसार
जालना.
मो.नं. 7768071099