मराठा नेते सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक यांची उपस्थिती; सकल मराठा समाज संयोजकाची माहिती..
कणकवली :
मराठा समाज आरक्षण मुद्यावर कोल्हापूर येथील गोलमेज परिषदेत १० ऑक्टोबर ला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्या संदर्भात राज्यस्तरावरील समाजाचे नेते सुरेशदादा पाटील व विजयसिंह महाडिक हे ५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची बैठक मराठा मंडळ कणकवली येथे होणार आहे, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे सकल मराठा समाज संयोजकाची दिली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्यातील सर्व मराठा समाज शिक्षण व नोकरीपासून वंचित झाला आहे . त्यामळे मराठा समाजातील सर्व जनता संतप्त झाली आहे आणि म्हणूनच २३ तारखेच्या गोलमेज परिषदेमध्ये सरकारने स्थगिती उठवली नाही तर संपूर्ण राज्यातील तमाम मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे आणि तीव्र आंदोलन छेडून संताप व्यक्त करणार आहे . त्याची झलक म्हणून १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे .
त्या अनुषंगाने २८ सप्टेंबर रोजी कणकवली येथे मराठा समाजातील सर्व ज्ञाती बांधवांची सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये १० ऑक्टोबरला जिल्हा बंद करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात झाले आहे .
त्यावेळी जिल्ह्यातील सर्व समाज बांधांना पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असून त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत . त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मराठा संघटना इतर सर्व मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि . ०५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंडळ कणकवली येथे समाजाच्या हितासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात येत आहे .
सदर सभेला कणकवली तालुक्यातील मराठा समाजाचे एस. टी. सावंत, लवू वारंग, एस.एल. सपकाळ, भाई परब, महेंद्र सांबरेकर, सुशील सावंत, अविनाश राणे, शेखर राणे, राकेश राणे, बाबू राऊळ, हरेश पाटील, स्वप्निल चिंदरकर, अमित सावंत, गजानन राणे, अमोल परब, दत्ता काटे, महेंद्र गावकर, नितेश नाटेकर, अनुप वारंग, संदिप राणे, तानाजी सावत इतर बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते .