जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ यांची अप्रतिम काव्यरचना
राबतो बळीराजा शेतात
तोच सावळा माझा हरी
वाहती घामधारा अंगातूनी
जशा थेंब थेंब पाऊससरी.
हरिपाठ ज्ञानदेव विठ्ठल
वाजते अपसूक टाळी
माझिया मनीच्या अंगणात
जप रामकृष्ण वेळोवेळी.
शेतशिवार हासते डोलते
कणसावर चिमणी पाखरे
विठ्ठला तुझ्या रे वारीसाठी
कशी सोडावी सांग लेकरे.
संसाराच्या अवघड वाटेवर
किती खाव्या रे खस्ता
न संपणाऱ्या या अंधारात
आशादीप उजळवून दे आता.
ऋतू वसंतासम दे नवचैतन्य
सहावेना जीवनी चटके
तूच सांग आता विठ्ठला
वारीला आम्ही का पोरके.
मनमंदिरी भरला भक्तीरस
कसं सोडवाव विचित्र कोडं
पंढरी वारीस येण्यासाठी
काढावी काहीतरी तूच तोड.
सा-या सृष्टीचा पालनहार
चराचरी तुझाच रे निवास
तोडू कसे पाश संसाराचे
तुझिया चरणाची मी दास.
पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे. 9011659747