You are currently viewing डिकेटीईच्या विद्यार्थ्यांची निसीकेन कंपनीत निवड

डिकेटीईच्या विद्यार्थ्यांची निसीकेन कंपनीत निवड

डिकेटीईच्या विद्यार्थ्यांची निसीकेन कंपनीत निवड

इचलकरंजी शहरातील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमामध्ये शिक्षण घेणा-या अनिकेत चव्हाण व निखील कुंभार या दोन विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन कंपनीच्या जयपूरमधील कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेले दोन्हीही विद्यार्थी निसीकेन, जयपूर येथे विविध पदांवर लवकरच रुजू होणार आहेत.याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वालिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डिकेटीई संस्थेमार्फत इंटरव्हयूचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते.
निसीकेन ही टोकियो, जापनस्थित वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून टेस्टींग आणि क्वालीटी इव्हॅल्युएशन यामध्ये या कंपनीचा हातखंडा असून या कंपनीने गारमेंटवर केलेल्या क्वालीटी रिपोर्टसना जगभर मान्यता आहे.या कंपनीच्या जयपूर शाखेमध्ये
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमामध्ये शिक्षण घेणा-या अनिकेत चव्हाण व निखील कुंभार या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या यशामध्ये डिकेटीईचे ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकिवाटे यांचा मोलाचा वाटा आहे.या विद्यार्थ्यांना डिकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा.आर.एस. वळसंग यांचे मोलाचे मागदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा