इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील आयजीएम उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हातकणंगले तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने व आयजीएम रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना अंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विधी सेवा समिती सदस्या सौ.शशिकला बोरा यांनी
आपल्या मार्गदर्शनात सांगितले.बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी रोखण्याच्या दृष्टीने समाजात जागृतीसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.
इचलकरंजी येथील हातकणंगले तालुका विधी सेवा समितीच्या वतीने समाजात कायद्याविषयी जनजागृती करतानाच अनेक प्रलंबित खटले सामंजस्याने निकाली काढले जातात.याशिवाय बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी , महिलांवरील अन्याय – अत्याचार ,वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.नुकताच हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष र. ना. बावनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना अंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी यांच्या वतीने व
आयजीएम उपजिल्हा
सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयजीएम रूग्णालयात
मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विधी समिती सदस्या , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ.शशिकला बोरा ,डॉ.महेश महाडिक
यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.तसेच यासाठी शासन स्तरावर होत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देवून
या कार्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर ,परिचारिका , सामाजिक कार्यकर्ते तसेच जागृत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी सामुहिकपणे तंबाखू सेवन प्रतिबंधाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रभारी सहायक अधिसेविका
सौ. वंदना गायकवाड ,आयजीएम रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रविंद्र शेटये ,हसीना नाईक ,रेखा काटे ,रुग्णालयाचे अधिकारी, सर्व कर्मचारी आणि रूग्ण मोठया संख्येने उपस्थित होते.