You are currently viewing शिक्षक भारती कणकवली आयोजित नवोदय सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद 

शिक्षक भारती कणकवली आयोजित नवोदय सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद 

कणकवली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित कणकवली तालुका मर्यादित मोफत नवोदय सराव परीक्षा ६ एप्रिल २०२२ रोजी मारुती विद्या मंदिर केंद्रशाळा जाणवली या ठिकाणी संपन्न झाली .कणकवली तालुक्यातील ८६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला .या मोफत सराव परीक्षेचे उद्घाटन कैलास राऊत शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग हुंबरट यांच्या हस्ते झाले . प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सुहास पाताडे विस्तार अधिकारी शिक्षण प्रभाग तळेरे शिक्षक भारती तालुका अध्यक्ष दशरथ शिंगारे ,शिक्षक भारतीय राज्य संघटक किसन दुखंडे ,महिला जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग आशा गुणीजन , तालुका सचिव श्रीराम विभुते ,केंद्रप्रमुख – काळू पवार जातवली , गोपाळ जाधव – साळिस्ते , राजेंद्रप्रसाद मणेरीकर – कळसुली ,सद्गुरु कुबल – शेर्पे ,अखिल भारतीय शिक्षक संघ कणकवली अध्यक्ष तथा केंद्रशाळा जानवलीचे शाळेचे मुख्याध्यापक शंकर बागवे , कणकवली कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष – संदीप कदम ,शिक्षक समितीचे पदाधिकारी विजय मेस्त्री ,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक -प्रदीप मांजरेकर .केंद्रशाळा शेर्पे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ , अमोल भंडारी उपशिक्षक केंद्रशाळा शेर्पेआदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली यांनी कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करून एक चांगला नवीन पायंडा निर्माण केल्याबद्दल उद्घाटक कैलास राऊत यांनी संघटनेला धन्यवाद दिले . तसेच सदर नियोजित सराव परीक्षेचे उद्घाटक म्हणून किशोर गवस गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कणकवली यांनी संघटनेच्या या मोफत सराव परीक्षेला शुभेच्छा दिल्याचे नमूद केले . सुहास पाताडे विस्ताराधिकारी शिक्षण प्रभाग तळेरे यांनी सुद्धा शिक्षक भारती कणकवलीने नवोदय विद्यालय निवड चाचणी पूर्वी मोफत सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हातभार लावला व एक व्यासपीठ निर्माण केले आहे .आणि हे कणकवली तालुक्यासाठी निश्चितल भूषणावह ठरेल . जास्तीत जास्त विद्यार्थी कणकवली तालुक्यातून जवाहर नवोदय विद्यालय येथे निवडले जातील असा आशावाद व्यक्त केला व शिक्षक भारती कणकवली संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले .केंद्रप्रमुख – के. एम . पवार , राजेंद्रप्रसाद मणेरीकर ,गोपाळ जाधव ,सद्गुरु कुबल ,यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या . प्रश्नपत्रिका निर्मिती साठी विशेष सहाय्य अतुल भोगे उपशिक्षक मारुती विद्यामंदिर केंद्रशाळा जाणवली व श्री दशरथ शिंगारे पदवीधर शिक्षक केंद्रशाळा शेर्पे यांचे लाभले . परीक्षा विभाग प्रमुख म्हणून मंगेश खांबळकर यांनी उत्कृष्ट कार्य केले तर परीक्षेचे नियोजन व व्यवस्थापन करण्याचे कामकाज संजय कोळी यांनी उत्तम रित्या पार पाडले . सदर सराव परीक्षा आयोजनासाठी स्थळ आणि वेळ याकरिता विशेष सहाय्य मारुती विद्यामंदिर केंद्र शाळा जाणवली चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -दिशा राणे , संदीप सावंत – सामाजिक कार्यकर्ते जानवली रंजन राणे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ,शाळेचे मुख्याध्यापक शंकर बागवे व सर्व सहकारी शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांना संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी धन्यवाद दिले . सरावपरीक्षेच्या संपन्नतेसाठी संघटना पदाधिकारी श्रीराम विभुते , मंगेश खांबलकर , कल्पना सावंत ,शशिकांत तांबे , गुरुप्रसाद पाटील ,कोमल दुखंडे, संजय कोळी ,मदनकुमार नारागुडे ,दीपिका चव्हाण ,सोनाली सावंत , अनुजा लोके ,प्रशांत पाटील ,रुपाली जाधव ,अनुजा रावराणे यांनी उत्तम मोलाचे सहकार्य केले . परीक्षा पर्यवेक्षणाकरिता दिपिका चव्हाण ,संदीप कदम ,विजय मेस्त्री ,पारकर मॅडम ,अनुजा रावराणे सेवानिवृत्त शिक्षिका ,रुपाली जाधव यांनी काम केले .या सराव परीक्षेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी केले . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोळी तर आभार तालुका सचिव श्रीराम विभुते यांनी मानले .

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित मोफत सराव परीक्षेचे उद्घाटन करताना कैलास राऊत , केंद्रप्रमुख काळू पवार ,शाळेचे मुख्याध्यापक शंकर बागवे .व शिक्षक भारती कणकवली तालुका पदाधिकारी व कणकवली तालुक्यातील शिक्षक वृंद .

प्रतिक्रिया व्यक्त करा