देवगड
अवकाळी पडलेल्या पावसात आंबा पिकाची हानी होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेले दोन दिवसात वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची हजेरी यामुळे आंबा बागायतदार हैराण झाले असून ऐन हंगामात तयार होणारे आंबा पीक धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणात आंबा पीक गळून गेले त्यामुळे बागायत दारांचे नुकसान आर्थिक नुकसान होत आहे.
यावेळी आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होत असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत .आणि आंबा बागायतदार शेतकरी याना नुकसानभरपाई देण्यात यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उतरविलेला पीक विमा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा.अशी आमची आग्रही मागणी देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर.
यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लेखी पत्राद्वारे देवगड तहसीलदार मारुती कांबळे ,तालुका कृषी अधिकारी प्रसाद भोसले यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,तालुका उपाध्यक्ष बबन घाटये,शहर उपाध्यक्ष उमेश कुळकर्णी, हिंदळे सोसा.व्हॉइस चेअरमन श्रीकृष्ण गिरकर,गणपत वालकर, अरुण धुरी उपस्थित होते. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे .मंगळवारी सायंकाळीनंतर ८ वाजल्या नंतर अवकाळी पाऊस कोसळला.ढगांचा गडगडाट,सोसाट्याचा वारा विजेचा लखलखाट या मुळे नागरिक भयभीत झाले.यातच बागायत दार विवंचनेत सापडले. देवगड तालुक्यात विविध भागात पाऊस कोसळल्यामुळे आंबा व काजू बागायतदार सह शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसापासून वरचेवर अवकाळी पाऊस कोसळत असून बदलत्या हवामानामुळे देखील बागायतदार चिंतेत आहेत .एकंदरीत या बदलत्या हवामानाचा फटका शेतकरी वर्गाला बसला असून येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे .त्यामुळे त्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.