You are currently viewing लिंगायत समाजाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच राहिल :खासदार धैर्यशील माने

लिंगायत समाजाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरूच राहिल :खासदार धैर्यशील माने

इचलकरंजी / प्रतिनिधी

लिंगायत धर्मास संविधानिक स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता आणि अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. समाजाच्या अन्य प्रश्नांसाठी गतीने पाठपुरावा सुरूच राहील, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
कुडलसंगम येथील बसव धर्मपीठ, महाराष्ट्रातील राष्ट्रीय बसव दल, लिंगायत गण मेळावा उत्सव समिती यांच्या संयुक्त आश्रयाखाली इचलकरंजीत नुकताच 17 वा लिंगायत गण मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी खासदार माने बोलत होते.

इचलकरंजी येथे दोन दिवस सुरू असलेल्या लिंगायत गण मेळाव्यात अल्लमप्रभू जयंत उत्सव, अल्लमप्रभुंचे वचन, पठण, धर्मचिंतन, चर्चागोष्टी, प्रवचन पार पडले. त्याचबरोबर सुप्रभात समयी इष्टलिंग पूजा, सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रीय बसव दल समावेश आणि राष्ट्रीय बसव दलात महिला संघटना आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र झाले. जगद्गुरू बसवकुमार स्वामी, श्रीमन निरंजन महाजगद्गुरू माता गंगादेवी, शरण बसवराज धन्नुर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम झाले. राष्ट्रीय बसव दल कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी प्रमोद परीट यांची यावेळी निवड करण्यात आली. अण्णासाहेब शहापुरे यांनी आभार मानले. यावेळी  प्रसाद खोबरे, महेश कोरे, चंद्रकांत चौगुले, सिद्राम कवळीकट्टी, यड्रावच्या उपसरपंच प्राची हिंगे, ग्रा.पं. सदस्य बाबासो राजमाने, गुरूप्रसाद कलशेट्टी, प्रसन्न परीट, सुधीर शहापुरे, शैलेश दरीबे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा