खेळाडू केंद्रबिंदू ठेवून सहकार्य करावे जिल्हा क्रीडा अधिका-यांचे आवाहन
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण यांनी हार्दिक स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा सचिव-दिनेश म्हाडगुत, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड,सोबत तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,स़घटनेचे जिल्हा पदाधिकारी सुनिल भाटिवडेकर, उत्तरेश्वर लाड, आकाश पारकर,संतप्रसाद परब यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करावे आणि खेळाडू हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम घ्यावेत निश्चितच क्रीडा कार्यालयाकडून उत्तम सहकार्य मिळेल असे सूतोवाच नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना भावना व्यक्त केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील दालनात छोटीखानी झालेल्या स्वागत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सलग दोन वर्ष अतिशय यशस्वीपणे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहिलेले विजय शिंदे यांनी क्रीडा शिक्षक महासंघ संघटनेने क्रीडा कार्यालयाला वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देत संघटनेचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी यांनाही असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
विजय शिंदे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पदाधिकारी बयाजी बुराण,दत्तात्रय मारकड व दिनेश म्हाडगूत यांनी विशेष कौतुक करीत नुतन जिल्हा अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
फोटो:- ६/४/२०२२
सिंधुदुर्ग: नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. शिरस यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्यावतीने स्वागत करताना संघटना पदाधिकारी सोबत तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे