सावंतवाडी
सावंतवाडी येथे तेजस्वी कंप्युटर्स चा उदघाट्न सोहळा दिमाखात संपन्न येथील इ्स्पायर एज्युकेशन ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या अंतर्गत तेजस्वी कॉम्प्युटर्स चा उदघाट्न सोहळा गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी पंचायत समिती तील बाल विकास प्रकल्प अधिकारी मान. श्रीम.संध्या परशुराम मोरे यांच्या शुभहस्ते पार पडला.
सदर कार्यक्रमाला डिजिटल वर्ल्ड मिशन सदस्य श्री. रमेश शेवाळे सर,वैभव सव्वलाखे सर,रवी तरळे सर, मोहम्मद रफिक सर हे उपस्थित होते
तेजस्वी कॉम्प्युटर्स या इन्स्टिट्यूट मध्ये मुलांना सरकारमान्य संगणक कोर्स सोबतच अबॅकस, हस्ताक्षर प्रशिक्षण, कोडींग, रोबोटिक्स यासारख्या गोष्टी एकाच ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध झाली असून इयत्ता पहिली पासूनचे विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच उन्हाळी सुट्टीसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या कॉम्प्युटर शिक्षणाचा जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा, तसेच नव्या युगाप्रमाणे आपण आपली प्रगती साधली पाहिजे असे प्रतिपादन बाल विकास प्रकल्प अधिकारी मान. श्रीम.संध्या परशुराम मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक श्री सागर सोन्सूरकर तर आभार संयोजक श्री मनोज शारबिद्रे यांनी केले.
तेजस्वी कॉम्प्युटर्स मार्फत घेतल्या जाणाऱ्या संगणक शिष्यवृत्ती परीक्षेला 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.