बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या आंबेखणवाडीतील गोपाळमळी येथे वझरावर जलस्त्रोत होते.त्या जलस्त्रोतावर काही वर्षे पाणी होते.त्यामुळे त्या पाण्यावरच नारळ,सुपारीच्या बागा ,भातशेती ग्रामस्थ करीत होते.शिवाय या परिसरातील माळरानावर गुरेढोरे चरत होती.व पाणी पिण्यासाठी येथे सर्व प्राणी यायचे.त्यांची व इतर वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी येथील पाण्याचा उपयोग व्हायचा.परंतु अलीकडच्या ५-८ वर्षांत सदर ठिकाणी डोंगरातील गाळ साचून जलस्त्रोतावर परीणाम होऊन पाणी बंद झाले होते.त्या मुळे शेतकरी,गुरेढोरे, व अन्य प्राणी यांना नाहक त्रास सहन करायला लागायचा. याबाबत डेगवे आंबेखणवाडीतील ग्रामस्थ तथा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगलदास देसाई व डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई यांच्या पुढाकाराने तसेच,ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शामसुंदर देसाई, ग्रामस्थ सर्वश्री वामन देसाई,गोपाळ देसाई,अमित देसाई,सखाराम देसाई,अत्माराम देसाई ,योगेश मांजरेकर व इतर आंबेखणवाडीतील ग्रामस्थ यांच्या सहभागातून खाजगी जेसीबीच्या सहाय्याने तेथील गाळ उपसून घेतला आहे.त्यामुळे तेथे पाणी मिळाल्याने ग्रामस्थ आनंद व्यक्त करुन केलेल्या कामाचे कौतुक करीत आहेत.
उल्हास देसाई,
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.