You are currently viewing मोहनराव सावंत यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे – पालकमंत्री उदय सामंत

मोहनराव सावंत यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे – पालकमंत्री उदय सामंत

मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीचा लोकार्पण सोहळा

सिंधुदुर्गनगरी,

मोहनराव सावंत यांचे सामाजिक कार्य हे सर्वांना नेहमीच प्रेरणा देणारे राहील. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा व त्यांचा वारसा पुढे न्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कै.मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीचा लोकार्पण सोहळा  पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.

                यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने,जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे, तहसीलदार रमेश पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, प्रथमेश सावंत, संजय पडते, नीलम सावंत पालव, सुशांत नाईक, शैलेश भोगले, बाळा भिसे, अँड हर्षद गावडे, महेंद्र सावंत, सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

                मुंबईमध्ये काम करत असताना आपल्या गावासाठी आपण काही देणे लागतो या भावनेतून मोहनराव मुरारी सावंत यांनी जागा खरेदी करून त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून ते शासनाच्या स्वाधीन केल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, हे त्यांचे सामाजिक कार्य जिल्ह्यातील नव्या पिढीतील राजकारणाला आदर्शवत आहे. विभागाच्यावतीने एक कोटी रुपये खर्चाचे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी केली होती. या इमारतीला पूर्वीप्रमाणेच मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र असे नामकरण करण्यात आले. कनेडी दशक्रोशीतील 20 गावांच्या सेवेसाठी कै. सावंत यांनी त्यावेळी माजी विद्यार्थी संघ आणि कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली होती. त्यामुळे शेकडो लोकांचे जीव आजवर वाचले आहेत. शैक्षणिक सुविधा असो, आरोग्याच्या सुविधा असो किंवा सामाजिक पातळीवरच्या सुविधा त्यांनी या दशक्रोशीमध्ये निर्माण केल्या. या इमारतीच्या पुढील बांधकामासाठी निधी मंजूर केला आहे. मोहनराव यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचा योग आला. हा अविस्मरणीय आहे.

                डॉ.प्रथमेश सावंत यांनीही मनोगतामध्ये आपल्या वडिलांचा आदर्श समाजापुढे ठेवून यापुढे कार्यरत राहण्याचा विश्वास व्यक्त केला. वडिलांनी केलेल्या कार्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन त्यांचे नाव कायम ठेवले हा विश्वास बळ देणारा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा