You are currently viewing निराधारांच्या आधार देण्यासाठी कणकवलीत काढली जनजागृती फेरी…!

निराधारांच्या आधार देण्यासाठी कणकवलीत काढली जनजागृती फेरी…!

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली सुरुवात…!

निराधारांच्या पुनर्वसानासाठी नागरिकांना स्वइच्छेने केली मदत…!

कणकवली

निराधार,मतिमंद,दुर्लक्षित ज्येष्ठ यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल.या उद्देशाने पणदूर येथील जीवन आनंद संस्था,कणकवली पोलीस ठाणे व आम्ही कणकवलीकर यांच्या माध्यमातून शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली.या फेरीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार,पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,नगराध्यक्ष समीर नलावडे,सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग,जीवन आंदन संस्थेचे संदीप परब,ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर,सचिव रवींद्रनाथ मुसळे,रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ . विद्याधर तायशेटे,डॉ . सुहास पावसकर,व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर , नगरसेविका मेघा गांगण, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर,जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी,संजय मालंडकर,कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर,निवृत्त मंडळ अधिकारी नामदेव जाधव,कलमठचे माजी सरपंच निसार शेख,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे विजय भोगले,आचरेकर प्रतिष्ठानच्या सदस्या लीना काळसेकर,विजय गावकर,सुप्रिया पाटील,माजी नगरसेवक उमेश वाळके,प्रसाद अंधारी,बंडू खोत,राजा राजाध्यक्ष,शशांक बेळेकर,प्रिया सरुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ही जनजागृती फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि पुढे बाजारपेठमार्गे झेंडा चौक ते पटकी देवी मंदिर अशी काढण्यात आली.या फेरीत अंगणवाडी सेविका , सामाजिक संस्थांचे सभासद , पोलीस कर्मचारी , महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.या फेरीत सहभागी झालेल्यांनी निराधारांच्या पुनर्वसानासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले.यावेळी फिरवण्यात आलेल्या दान पेटीत अनेकांनी आप आपल्या परीने मदत देखील केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा