महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन्स फॉर वुमेन(बीसीए) शिरगांव,रत्नागिरी येथील टी.वाय.बीसीए च्या विद्यार्थिंनीसाठी मागील बारा वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंट अंतर्गत विप्रो, इन्फोसिस, कॉग्नीझंट, टीसीएस, ॲटॉस, पटनी Capgemini व Deloitte इ. बहुराष्ट्रीय कंपनींच्या इंटरव्हयूवचे आयोजन करण्यात येते.
लेखी व इंटरव्हयु च्या पूर्व तयारीसाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींना aptitude test training इंग्लिश स्पिकींग इ. विषयामार्फत प्रशिक्षण दिले जाते.
Capgemini तर्फे घेण्यात आलेल्या लेखी व इंटरव्हयू परिक्षेतून टी.वाय.बी.सी.ए च्या कु.गौरी घाणेकर , कु.ईशा जोशी, कु.शालवी देसाई, कु.ऐश्वर्या निंबाळकर ,कु.पायल हजारे या विद्यार्थिनींची तसेच Wipro तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतून कु.ईशा जोशी व साक्षी बने यांची यशस्वी निवड झाली.
या विद्यार्थिनींना बीसीए महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या कु.स्नेहा कोतवडेकर,ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर स.प्रा.केतन पाथरे व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल रत्नागिरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मा.श्री.मंदार सांवतदेसाई तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.