You are currently viewing मळगांवात विहीरीत पडलेल्या म्हैशीला जिवदान

मळगांवात विहीरीत पडलेल्या म्हैशीला जिवदान

सावंतवाडी

मळगांव रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ उर्फ बाळा सातार्डेकर यांच्या विहिरीत पडलेल्या म्हैशीला स्थानिक ग्रामस्थांनी जिवदान दिले. चरायला सोडलेली ही म्हैस अचानक पाण्यात पडली. विहिर खोल असल्याने व विहिरीत भरपूर पाणी असल्याने तिला बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे स्थानिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने अथक परिश्रम घेत तिला बाहेर काढले.

यावेळी मळगांवचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी ग्रा.प. सदस्य गजानन सातार्डेकर, चंद्रशेखर पेडणेकर, बाळू पेडणेकर, श्यामसुंदर सातार्डेकर, प्रद्युम्न सातार्डेकर, पार्थ सातार्डेकर, भाऊ सातार्डेकर, अनिल रेडकर, राजा रेडकर, शरद रेडकर, राजू रेडकर, अजय मांजरेकर, शत्रुघ्न मातोंडकर यांच्यासह महिला हर्षदा पेडणेकर, क्षमा सातार्डेकर, माया सातार्डेकर, सिद्धी सातार्डेकर, पायल सातार्डेकर आदी उपस्थित होत्या. म्हैसीला जिवदान मिळाल्याने शेतकरी तथा म्हैस मालक बाळा सातार्डेकर यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा