You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. संदीप सावंत

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. संदीप सावंत

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. संदीप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील हे ३१ मार्च रोजी निवृत्त झाले त्या रिक्त पदी डॉ. सावंत यांनी १ एप्रिलपासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

डॉ. सावंत हे येथील तालुक्यात गेली १९ वर्षे सेवा देत आहेत २००१ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एम बी बी एस पदवी उत्तीर्ण केल्यानंतर ते २००३ ते २००६ या कालावधीत सावंतवाडी येथे वैद्यकीय अधिकारी, २००६ ते २०१२ या कालावधीत सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २०१२ ते २०१३ या एक वर्षासाठी सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले आहे त्यानंतर दोन वर्षे त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई जे जे रुग्णालयात ‘बालरोगतज्ज्ञ’ म्हणून शिक्षण पूर्ण केले सन २०१५ पासून ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळून अन्य रुग्णांचीही वैद्यकीय तपासणी ते सुरू ठेवणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा