संत वाङमयात ‘भाव’ या प्रकाराला फार महत्त्वाचे स्थान असते. त्याचप्रमाणे भाव हा शब्द संत वाङमयात अनेक अर्थी आलेला आहे. त्यामुळे भाव हा शब्द परमार्थात पडलेल्या लोकांना गोंधळात टाकणारा ठरतो.भाव या शब्दाचा संत खास उपयोग करतात तो एका विशिष्ट अर्थाने.’भाव धरा रे,आपुलासा देव करा रे’ किंवा ‘भाव बळे आकळे एरव्ही ना कळे’ वगैरे संतांची वचने भावाचे महत्त्व सांगणारी आहेत. *थोडक्यात,’भाव’ म्हणजे ‘संबंध’. देव आणि साधक यांच्यातील संबंध जर नीट उमजला नाही तर अहंकाराचा ‘समंध’ साधकाच्या मानेवर बसून त्याला गोत्यात आणल्याशिवाय रहात नाही. म्हणून खरा भाव नसेल,तर तथाकथित भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड किंवा कवायत होय.भाव कसा धरायचा हे सद्गुरूच शिकवू शकतात,किंबहुना भाव कसा धरायचा व देवाचा साक्षात्कार कसा करून घ्यायचा,हे शिकवितात तेच खरे सद्गुरू होत.*
🎯 *विठ्ठल हा मंत्र आहे,विठ्ठल हे नाम आहे,विठ्ठल हा भाव आहे व विठ्ठल हा देव आहे.*
🎯 *भूतमात्रांत भगवंताचा निकट व प्रगट भाव म्हणजे माता.*
🎯 *भाव सरला की जो सुरू होतो तो भव.*
🎯 *भोळा भाव क्वचित काम करतो हे खरे,पण ‘भोळा भाव गोता खाय’ हे त्याहूनही खरे.*
🎯 *’मी भगवंताचा व भगवंत माझा’ असा ज्याचा भाव तो भाग्यवंत.*
🎯 *भावाची जोपासना हीच खरी देवाची उपासना होय.*
🎯 *भाव हा भजनाचा आत्मा आहे.*
🎯 *”केवळ देवच आहे न अन्यः” या धारणेला अनन्यभाव असे म्हणतात.*
🎯 *जशी वृत्ती तशी प्रतीती.*
🎯 *भगवद्भावांत ‘मी’चा होतो अभाव व देवाचा होतो आविर्भाव.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏