You are currently viewing महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने १३पुस्तकांचे विनामूल्य वितरण….

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने १३पुस्तकांचे विनामूल्य वितरण….

 

अमरावती दि.४ (प्रति) – स्थानिक डाँ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमा च्या वतीने येत्या 10 एप्रिल 2022 रोजी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तसेच १४ एप्रिल रोजी येणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने स्पर्धा परीक्षेच्या तेरा पुस्तकांचे ऑनलाइन विनामूल्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले आहे .त्यासाठी ज्यांना ही पुस्तके हवी आहे त्यांनी 98 90 96 70 03 या प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या क्रमांकावर मला तेरा पुस्तके पाठवावी असा संदेश द्यावयाचा आहे. या पुस्तकांमध्ये मी आयएएस अधिकारी होणारच.शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर. प्रेरणा स्पर्धा परीक्षेची .मी आयएएस अधिकारी होणारच भाग 2. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी .आयएएस अधिकार्‍यांची संघर्षगाथा .आनंदी राहा यशस्वी व्हा. आयपीएस अधिकाऱ्यांची संघर्षगाथा. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी हिंदी .स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी इंग्रजी. सक्सेस स्टोरीज ऑफ आयएएस ऑफिसर .सक्सेस स्टोरीज ऑफ आयपीएस ऑफिसर या पुस्तकांचा समावेश आहे .या पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स सर्व संदेश देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना व पालकांना विनामूल्य देण्यात येणार आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही भारतातील सगळ्यात मोठी आयएएस अकादमी असून या उपक्रमात जवळपास एक लाख विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. हे सर्व उपक्रम विनामूल्य असून विद्यार्थ्यांना फक्त नाममात्र एक रुपया शुल्कामध्ये दुसऱ्या वर्गापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आय ए एस या परीक्षेचे प्रशिक्षण दिल्या जाते .विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची त्या-त्या वर्गाची पुस्तके विनामूल्य वितरित करण्यात येतात. अशाप्रकारे मिशन आयएएस खऱ्या अर्थाने राबवीणारी ही भारतातील एकमेव अकादमी आहे .या अकादमीला आतापर्यंत ३५० आयएएस, आयपीएस, आयएफएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून भारताच्या माजी राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील, योगगुरू श्री रामदेव बाबा,सुप्रसिद्ध समाजसेवक श्री अंण्णा हजारे त्याच बरोबर सुप्रसिद्ध समाजसेवक श्री पोपटराव पवार,डॉ. श्रीराम लागू,निळू फुले बाबा आढाव,नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे,मेधा पाटकर आदी मान्यवरांनी या संस्थेमध्ये या संस्थेच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्ताने व भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विनामूल्य पुस्तकाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आय ए एस च्या वतीने प्रा. पल्लवी नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा