दोडामार्ग :
देशात महागाईने कळस गाठला असून जीवनावश्यक वस्तू बरोबर पेट्रोल डिझेल खाद्यतेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत . यावर केंद्र सरकार गप्प असून अच्छे दिन काही येत नाही यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने राज्यभर आज टाळ्या वाजवून उपहासात्मक आंदोलन केंद्रसरकार विरोधात युवासेनेच्या वतीने छेडण्यात येत आहे . दोडामार्गात आज शिवसेना कार्यालयात युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले व केंद्र सरकारचा वाढत्या महागा विरोधात निषेध करण्यात आला .
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी , शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी , दोडामार्ग महिला प्रमुख श्रेयाली गवस , उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई , सुभाष पांगम , विभागप्रमुख सज्जन धाऊसकर , भगवान गवस , संदेश देसाई , विवेक एकावडे , गुरुदास सावंत यांसह युवासेना व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .