सदर उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांचा पुढाकार
वैभववाडी
ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे व जनकल्याण बहुउद्देशीय संस्था वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सडूरे शिराळे येथील सर्व वयोगटातील महिलांसाठी रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांच्या पुढाकारातून 15 वित्त आयोग मधून ह्या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
16 मार्च 2022 रोजी या शिबिराचे सरपंच संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.यावेळी जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष किशोर जैतापकर,ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,माजी सरपंच विजय रावराणे ,ग्रामसेवक प्रशांत जाधव,रमाकांत रावराणे,नाना राणे,संजय जंगम,संतोष (बाळू)भोसले,सागर मेजारी,प्रकाश शिंदे,रामचंद्र अडूळकर, अंगणवाडी सेविका सविता पाटील,वैशाली रावराणे,सावंत मॅडम,नंदू रावराणे,सुनील राऊत,दिपक भावे, रुपाली रावराणे,मोहन जंगम व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या शिबिराला गावातील महिलांनी उस्पूर्त प्रतिसाद देत आपल्या रक्ताची तपासणी करून घेतली. या तपासणी मध्ये संपूर्ण रक्त घटक (CBC), कॅल्शियम, प्रोटीन, अल्बूमिन, शुगर या सर्वांच्या करण्यात आल्या तर थायरॉईड, किडनी टेस्ट,ANC प्रोफाइल या तपासण्या अवशकते नुसार करण्यात आले. या तपासणी मध्ये काही नवीन शुगर चालू झाल्याचे निदान झाले तर काही थायरॉईड निदान झालेत. काहींचे हिमोग्लोबिन प्लेटलेट्स, लाल पेशी पांढऱ्या पेशी कॅल्शियम प्रोटीन अल्बुमिम हे घटक कमी जास्त झालेले निदान झाले. या सर्वांना त्यांची रिपोर्ट पोच करण्यात आले.रिपोर्ट सुपुर्द करते वेळी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी सडूरे PHC मध्ये स्वखर्चाने केस पेपर कडून त्यांची तपासणी मोफत करून दिली.काहीना काही आजार वेळेत निदान झाले मुळे त्यांना वेळेत उपचार मिळणार असेलमुळे त्यांच्या अडचणी लवकर दूर होतील असा विश्वास वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्रकर यांनी व्यक्त केला आहे. असे उपक्रम सर्वत्र होणे काळाची गरज आहे असेही डॉ महेंद्रकर म्हणाले. उपस्थीत सर्व महिलांनी जनकल्याण बहुद्देशीय संस्था ,ग्रामपंचायत सडूरे यांच्यासहित हा उपक्रम ज्यांच्या पुढाकारातून झाला ते ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचे विशेष आभार मानले.