You are currently viewing आरवली येथे “७ व ८ मे”ला दशावतार नाट्य स्पर्धेचे आयोजन…

आरवली येथे “७ व ८ मे”ला दशावतार नाट्य स्पर्धेचे आयोजन…

वेंगुर्ले

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या माध्यमातून ७ व ८ मे या कालावधीत वेंगुर्ले तालुक्यातील साळगावकर मंगल कार्यालय आरवली येथे दशावतार नाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या प्रथम तीन संघाना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार आणि ५ हजार अशी बक्षीसे देण्यात येणार आहे. त्याच बरोबर उत्कृष्ट स्त्री पात्र कलाकार, उत्कृष्ट खलनायक, उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्कृष्ठ संगीतसाथ अशी वैयक्तीक पारीतोषीक देवून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाच वृध्द दशावतार कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =