वेंगुर्ला
हिदू नववर्ष स्वागत समितीतर्फे २ एप्रिल रोजी सायंकाळी हिदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन केले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ होत आहे. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शनिवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेते हिदू नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्वागतयात्रा श्रीदेव रामेश्वर मंदिरातून सुरु होऊन शिरोडा नाका, जुना एसटी स्टॅण्ड, नाका, बाजारपेठ, मारुती मंदिर मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे येऊन या यात्रे चा समारोह होणार आहे. तरी यात्रेसाठी सायंकाळी ४.३० वाजता रामेश्वर मंदिर येथे सर्वांनी एकत्र यावे. तालुक्यातील सर्व बंधूभगिनींनी पारंपारिक वेशात नववर्षाच्या स्वागत यात्रेत सहभाग व्हावे असे आवाहन हिदू धर्माभिमानी मंडळी यांनी केले आहे.