You are currently viewing बैल झुंजीतील संशयीतावर कठोर कारवाई होणार

बैल झुंजीतील संशयीतावर कठोर कारवाई होणार

व्हॉट्स अँपवर व्हिडीओ फोटो शेअर करून राक्षसी आनंद घेणार्‍यांविरोधात कारवाई सुरु! – अपर जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे

सिंधुदुर्गनगरी

निष्पाप प्राण्यामंधे बैल झुंज लावून राक्षसी आनंद घेणार्‍या मानवी प्रवृत्ती विरोधात सिंधुदुर्ग पोलीसांनी कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. तळगाव गावडेवाडी येथी बैल झुझीत बैलाचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी असून खेद व संतापदायक आहे. या पुढे या जिल्हात प्राणी व पक्षांच्या झुंजी व त्यावर पैजा लावण्याच्या घटना घडू नयेत याची दक्षता पोलीस दल घेईल अशी ग्वाही सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांनी दिली.

या घटनेतील संशयीत आरोपींवीरोधात कठोर कारवाई होईल व या घटनेत सोशल मिडीया व वाँट्स अँप गृप वर अँक्टिव्ह असणार्‍या तसेच या घटनांचे व्हिडीओ व फोटो शेअर करण्यार्‍याच्या विरोधातही पोलीस कारवाई सुरु झाली आहे अशी माहीतीही नितीन बगाटे यांनी दिली. या बैल झू्जी मधे शर्ट काढून नाचणार्‍या व आनंदोस्तव साजरा करणार्‍या नागरीकांची कृतीही चूकीची आहे असेही ते म्हणाले.मृत्यू झलेल्या त्या बैलाचे शव विच्छेदन होणार आहे. व या बैल झूंझीत सहभागी झालेल्या आयोजन करणर्‍या तसेच बैल मालकांविरोधात भादवी ४२९ सह कलम ११ नुसार सर्व संशयीताविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

हे गुन्हे दखलपात्र असून ५ वर्षा पर्यन्त शिक्षा आहे असेही नितीन बगाटे यांनी सांगीतले. जिल्हातील नागरीकांनीही अशा झुंजी किंवा प्राणी पक्षामध्ये स्पर्धा त्यावर पैजा अशा घटना असतील तर थेट पोलिस टोल फ्री क्रमांक ११२ यावर माहीती द्यावी असे आवाहनही अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केले. जर तुम्हाला या घटनेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस पाटील तसेच पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील शांतता समित्यांच्या बैठका घेण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे.या पुढच्या काळात अशा प्राणी पक्षांमधे झुंजा किंवा स्पर्धा होणार नाहीत त्यासाठी पोलीस कठोर भूमिका घेतील असेही नितीन बगाटे यांनी स्पष्ठ केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा