सिंधुदुर्गनगरी :
शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी दि. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाही विवरणपत्र ई आर-1 हे ऑनलाईन पद्धतीने 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत भरुन पाठविण्यात यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या 02362-228835 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र यांनी केले आहे.