राजेंद्र दाभाडे; संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात झालेल्या बैल झुंज प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. या झुंजीमुळे एका बैलाचा जीव गेला आहे. त्यामुळे कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कणकवली डीवायएसपी व मालवण पोलीस अधिकारी यांनी झुंज झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. तर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.