सिंधुदुर्गनगरी :
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET 2020 या सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवार दि. 01 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 (दि. 10 ऑक्टोंबर 2020 व दि. 11 ऑक्टोबर 2020 हे दिवस वगळून) रोजी सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत पुढील उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. एस.एस.पी.एम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली येथे प्रत्यक्ष परीक्षेस प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थींची संख्या 1185 तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ प्रत्यक्ष परीक्षेस प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थींची संख्या 470 असे एकूण 1655 विद्यार्थांची संख्या असणार आहे. असे सुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या कळवितात.