You are currently viewing कामगारांच्या प्रश्नी ९ ऑक्टोबरला आत्मक्लेश उपोषण….

कामगारांच्या प्रश्नी ९ ऑक्टोबरला आत्मक्लेश उपोषण….

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून आंदोलनाची घोषणा; ७ ऑक्टोबर पर्यत कामगारांना पगार द्या..

कणकवली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवाची जोखीम घेऊन एसटी कामगार सेवा बजावत आहेत. आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतनाचा प्रश्न गंभीर असल्याने ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण करणार असल्याची माहिती कोकण प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी दिली.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करून सदर परिस्थिती ही शासन व प्रशासन दरबारी मांडली आहे.

मागील जुलै पेड इन ऑगस्ट, ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचे वेतन तर प्रलंबित आहे. परंतु आताचे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाची सुद्धा त्यात भर पडत आहे. या तीन महिन्या पासूनचे वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही कर्मचारी मोल मजुरी, गवंडी काम, भाजी विक्री करून कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत.

त्यामुळे ०७ ऑक्टोबर २०२० पर्यंत जर एसटी कामगारांचे जुलै, [vsrp vsrp_id=”” class=””]ऑगस्ट चे प्रलंबित व येत्या सप्टेंबर महिन्याचे वेतन न झाल्यास दि.०९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय कार्यालयां समोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे,असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे कोकण प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा