You are currently viewing आई …

आई …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय पुरस्कार इत लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

आई आई आई
गेली का ग घाई घाई ….

आठवते तू ग आता
येते ग नयनी पाणी
दळता दळता तू ग
गाईली मज तू गाणी
पांग न फेडले तुझे ग आम्ही
रूसली का ग तू आई…

तळहात पाळणा
नेत्रांची ती निरांजने
हाताला पडले घट्टे
सुटले नाही दळणे
दमली का ग पुसले नाही
म्हणून केली का घाई …

 

पहाटे उठणे तुझे
चुकले नाही ग तुला
पाचवीला पुजला
बालपणातच चुल्हा
अंगणी सडा रांगोळीतच
नित्य तू दिसते आई….

 

आई झाल्याविना नाही
कळे ना हो आईपण
चुलीत धूर तो सदा
चुकेना ते सरपण
फुंकून झाले का डोळे ग लाल
कळले नाही ग आई..

 

आठवता तू येतो ….
मनात माझ्या ग कढ
कळेना झाली का सांग
सांग तुझी परवड
रडून आता होणार काय?
येणार नाही तू आई…

आई आई आई ….
गेली का तू घाई घाई …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २३ मार्च २०२२
वेळ : रात्री ९ : ५५

प्रतिक्रिया व्यक्त करा