क्रमशः..
थोडक्यात, माणसाने सदैव एक पथ्य सांभाळलेच पाहिजे, ते म्हणजे जीवन जगत असताना त्याच्या हातून जो आचार घडेल म्हणजेच कर्म घडेल ते कर्म त्याच्या स्वतःच्या हिताचे व इतरांच्या कल्याणाचे असलेच पाहिजे. दुसऱ्यांना दुःखी करून माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. त्याचबरोबर इतरांना यथाशक्ती सूखी करण्याचा प्रयत्नात माणसाला अगणित सुखाची प्राप्ती होते. म्हणूनच जीवनविद्येचा खालील सिद्धांत जगातील प्रत्येक माणसाने सदैव स्मरणात ठेवला पाहिजे.
*” तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख-दुःख न चुकता तुमच्याकडे बूमरँग होऊन सहस्त्र पटीने परत येईल हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.”* सारांश, या शहाणपणाची कास धरून पुण्य संपादन करण्यात धर्म आहे तर अहंकार व अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पापांचा पर्वत निर्माण करण्यात अधर्म आहे, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोण आहे.
*–सद्गुरू श्री वामनराव पै.*