मनसेच्या तक्रारीनंतर ग्राम विकास विभाग व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या रॅकेटने यापूर्वी केलेले खरेदी व्यवहार हे प्रचंड अनियमितता दर्शवणारे ठरल्याने शासनाच्या पैशांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अगदी अलीकडील शिक्षण विभाग वॉटर प्युरिफायर खरेदी घोटाळा हे ताजे उदाहरण असून कारवाईसाठी प्रलंबित असताना मनसेने जिल्हा परिषदेत इकडे संगणक खरेदी घोटाळ्याबाबत आक्षेप घेतला आहे मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत वित्त आरोग्य कृषी शिक्षण आधी विभागाकडील मागील तीन वर्षातील संगणक खरेदीमध्ये प्रचंड अनियमितता असून शासन नियमांची काय म्हणले भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेली आहे. याबाबत मनसेच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व विभागीय आयुक्त कोकण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना तात्काळ सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च दर्जाची संगणक खरेदी कागदावर दाखवून प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचे संगणक खरेदी करण्यात आले असा मनसेचा आरोप आहे. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेकडील खरेदी व्यवहार वादात सापडले असून खरेदी भ्रष्टाचाराचे नवीन उदाहरण मनसेच्या तक्रारीच्या माध्यमातून समोर आले आहे. जिल्हापरिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रॅकेट संगनमताने शासन निधीचा अपहार करत आहेत व राज्य शासनाकडील काही मंत्री अशा भ्रष्ट प्रवृत्तींना पाठीशी घालत असल्यानेच दिवसेंदिवस घोटाळ्यांमध्ये वाढ होत आहे. बदली झालेले अधिकारी नियमबाह्य पध्दतीने आस्थापनेत “ठेवून” घेतल्यानेच अशीच जिल्हा परिषद प्रशासनामध्ये घोटाळ्यांची मालिका चालूच राहणार आहेे. या भ्रष्ट प्रवृत्तींवर कठोर कारवाई होत नसल्यानेच जनतेचा पैसा गिळंकृत करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, अशी प्रतिक्रिया मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्षक प्रसाद गावडे यांनी बोलताना दिली.