वैभववाडी
आ. नितेश राणे यांच्या मतदारसंघात भाजपामध्ये प्रवेशाचा धडाका पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आज लोरे नं. 2, गोरुलेवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे येथे प्रवेश कार्यक्रम पार पडला.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी उपसभापती अरविंद रावराणे, आचिर्णे सरपंच रुपेश रावराणे, आदेश रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, बुथ अध्यक्ष भरत मांजलकर व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश गवाणकर, सखाराम मांजलकर, प्रकाश मांजलकर, राजेंद्र कदम, रवींद्र धावडे, सागर कदम, सोमा मांजलकर, योगेश मांजलकर, संकेत कदम, मनोहर मांजलकर, राजेंद्र मांजलकर, रमेश मांजलकर, अनिल मांजलकर, श्रेयस मांजलकर, सुरेश मांजलकर, मारुती मांजलकर, गणपत मांजलकर, संभाजी गवाणकर, सचिन मांडवकर, सचिन गवाणकर, सुभाष गवाणकर, रामचंद्र गवाणकर, सुभाष गोरुले, भिकाजी गोरुले, शांताराम मांजलकर, बाळकृष्ण मांजलकर, विशाल धावडे, तुषार मांजलकर, प्राची मांजलकर, संगीता कदम, रिया कदम, साक्षी मांजलकर, मनीषा मांजलकर, विजया मांजलकर, शुभांगी गवाणकर, विजया मांजलकर, प्रियांका मांजलकर व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.