सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षित होऊ लागले,याच आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भूमीपूत्रानी पर्यटनावर आधारित लहान मोठे व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.त्यासाठी खाजगी,सहकारी,राष्ट्रीय बॅंका कडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले होते,पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आणि नैसर्गिक संकटामुळे हा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडला, देश विदेशातील पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतानाच कोरोना महामारीचे महाभयंकर संकट जगासह आपल्या देशात आले आणि पर्यटन व्यवसाय व पर्यटन व्यावसायिक पूर्णतःआर्थिक अडचणीत सापडला,
आता कुठे कोरोना आटोक्यात येत असून देश विदेशातील पर्यटकांना पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठीआपला जिल्हा खुणावत आहे,मात्र दोन वर्षांपूर्वी येथील पर्यटन व्यावसायिक स्थिर स्थावर झालेले होते,पण गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अस्थिर झालेले आहेत,त्यांचा व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आकारले जाणारे *GST* सह विविध व्यावसायिक कर किमान पुढील दहा वर्षे रद्द करून कर सवलत दिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्कळीत झालेला पर्यटन व्यवसाय पून्हा सुरळीत होऊन देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यात येण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आकारल्या जाणाऱ्या जीएसटी सह विविध प्रकारच्या करांमध्ये पुढील दहा वर्षे सवलत देण्यात यावी,अशी मागणी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री
नाम.आदित्य ठाकरे साहेब यांच्या कडे आज कुडाळ येथील लेमन ग्रास येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले,
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर.जिल्हा सरचिटणीस भास्कर परब.जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे,आशिफ शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीरभाई शेख,सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी,शहर अध्यक्ष देवा टेमकर,इफ्तिकार राजगुरू इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी मंत्री महोदयांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,