You are currently viewing ….. बदल हा नैसर्गिकच….

….. बदल हा नैसर्गिकच….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्य बियॉन्ड सेक्स कादंबरीच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा अप्रतिम लेख

खुप दिवसांपासुन वाचकांचे मेसेजेस येताहेत मॅडम लेख का बंद केले?? .. कादंबरी लिखाण सुरु आहे म्हणुन लेख बंद केले होते .. माझ्या लेखांची आवर्जून वाट पहाणाऱ्या माझ्या वाचकांसाठी खास हा लेख..
अनेकदा अनेक गृपमधे मी वेगवेगळ्या कारणाने जाते आणि माणसं वाचत बसते.. गेल्या आठवड्यात एका मित्रासोबत डिनर ला गेले होते.. त्याला नवीन कादंबरीचा विषय ऐकवत होते तितक्यात साधारणपणे तीशीतील एक जोडपं तिथे आलं.. तिचा ड्रेस आणि पर्स खुप छान होती. मी माझ्या मित्राला म्हटले , तिचा ड्रेस बघ छान आहे ना आणि तीही सुंदर आहे असं मी म्हटलं त्यावर तो म्हणाला माझी समोर बसलेली मैत्रीण जास्त सुंदर आहे .. जरा अमळशी लाजलेच😍😍.. त्याला म्हटलं काय हवय तुला ?? .. तो म्हणाला अग ती फक्त गोरी आहे फीचर्स तुझे सुंदर आहे.. माझी सावळी त्वचा गुलाबी गुलाबी झाली.. लाजुन चुर्र्रर झाले हो अगदी खरच.. सोनल तुला लाजता ही येतं असं तो पुटपुटला आणि आम्ही दोघे हसलो तितक्यात माझ्या कानावर शेजारच्या टेबलवरुन एक वाक्य आलं, हे दोघे नवरा बायको नसणार म्हणुन इतके हसताहेत ,मित्र असावेत नारे , त्यावर त्या कपलमधील तो मुलगा म्हणाला अगं मग आपण कोण आहोत, अय्या मी विसरलेच की.. तेही दोघे हसायला लागले आणि आम्ही दोघांनी कोणाला तरी हसवलं म्हणुन मला आनंद झाला.. मग मी टेबल वरुन उठले आणि सेल्फी काढायला मित्रापाशी गेले आणि आमचा फोटो आमच्या गृपवर शेअर केला . लगेचच तीनेही मोबाईल काढला आणि फोटो काढणार इतक्यात मी तिला म्हटलं मी काढुन देउ का तुमचा फोटो.. ती खुश झाली आणि तिने कॅमेरा सुरु करुन फोन माझ्या हातात दिला.. छान पोजेस मधे त्यांचे ३/४ फोटो काढले आणि जवळ जाऊन म्हटलं आम्ही फ्रेंड्स आहोत हे माझ्या नवऱ्याला माहीत आहे आणि मी आता फ्रेंड सोबत जेवायला आलेय हे माझ्या नवऱ्याला माहीत आहे .. माफ करा मला मी तुम्हाला ओळखत नाही त्यामुळे मला सांगायचा अधिकार नाही पण जर घरी माहीत नसेल आणि हे मोबाईलमधले फोटो जर का तुमच्या घरी पाहीले गेले तर अडचण येउ शकते.. तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या असं बोलुन मी माझ्या टेबल पाशी आले माझ्या बॅगेतुन बियॉन्डसेक्स कादंबरी काढली आणि त्या दोघांना दिली आणि त्याना म्हटलं हा तुमचाच विषय आहे .. मी माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय.. दोघांनी जरूर वाचा .. माझा नंबर आहे पुस्तकात त्यावर मला मेसेज करुन पुस्तक कसं वाटलं सांगा.. मी पुस्तक सहसा कोणाला फुकट देत नाही पण आज तुम्हाला का द्यावं वाटलं माहीत नाही .. Thanks mam.. असं म्हणत तिने तिथेच पुस्तक चाळायला सुरुवात केली आणि आम्ही आमच्या गप्पात रमलो… थोड्या वेळाने ते कपल मला बाय करुन निघुन गेलं आणि काल त्या मुलीचा मला फोन आला मॅम भेटु शकता का प्लीज.. मी राखी , तुम्हाला आठवतय का पहा तुम्ही मला पुस्तक गिफ्ट दिलं होतं , त्यावर मी म्हटलं पुस्तक वाचलं का?? ..त्यावर ती म्हणाली, दोघानीही वाचलं आणि आम्हाला आमच्या मित्राना गिफ्ट द्यायचय त्यामुळे तुमच्यासोबत फोटो घेउन आम्हाला दहा पुस्तके विकत हवी आहेत आणि मॅडम ते फोटो मी फोनमधुन डीलीट केले कारण तुमच्यासारखं मी घरी नाही सांगु शकत .. आमच्या डोळ्यात अंजन घातलं तुम्ही .. त्यावर मी तिला म्हटलं , बदल हा नैसर्गिक आहे.. शेवटपर्यंत काय रहात असेल तर तो बदल असतो..पण तो बदल काय आणि किती असावा यावर आपला कंट्रोल असायला हवा.. आपला संसार , कुटुंब महत्त्वाचे ते जपा.. पक्षी सुद्धा संध्याकाळी घरट्याकडेच परत जातात.. निसर्गनेच आपल्याला ही शिकवण दिलेय.. मॅम अगदी खरय हो तुमचं, यातलं एक पुस्तक मी अशाच एखाद्या अनोळखी कपल ना देइन , मला त्या मुलीच्या विचारांचा हेवा वाटला .. बियॉन्ड सेक्स लिहुन घेतल्याबद्दल त्या विधात्याची कृतज्ञता व्यक्त केली.. सोशल मिडीयामुळे वहावत न जाता बॅलन्स असेल तर प्रत्येकजण सागर- मीरा होवु शकतं..
स्पर्श या विषयावरील कादंबरीचं प्रकाशन एप्रिलमधे आहे.. तारीख ठरली की कळवेनच.. माझ्या वाढदिवसानिमित्त वाचकाना खास भेट असेल..

सोनल गोडबोले
लेखिका बियॉन्ड सेक्स

प्रतिक्रिया व्यक्त करा