राष्ट्रवादी ने दिले पर्यटन मंत्र्यांना निवेदन
शहरातील साडेतीनशे वर्षांपूर्वीच ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदीर, दामोदर भारती महाराज मठ आणि आत्मेश्वर तळीच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी निधी मिळावा अशी मागणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आली. कुडाळ येथील बैठकीदरम्यान खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत आदींच्या उपस्थितीत ही मागणी करण्यात आली.
या वास्तूंना ऐतिहासिक वारसा लाभलेला असून सावंतवाडीच्या लौकिकात भर घालणाऱ्या या वास्तू आहे. या वास्तू पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान कमिटीशी संलग्न आहेत. मात्र, या वास्तुच्या नुतनीकरण, सुशोभीकरणासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी प्राप्त झाला नाही. या वास्तूंसाठी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून हा निधी द्यावा अशी मागणी मंत्री आदीत्य ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी केली. हे मंदिर सावंतवाडी संस्थानचे राजे तिसरे खेम सावंत-भोसले अर्थात ‘राजर्षी’ यांच्या काळात स्थापन करण्यात आल असून दोन शिवलिंग असणार हे एकमेव मंदिर आहे. तर येथील आत्मेश्वर तळी ही बाराही महिने उतू जाते. या ठिकाणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची श्री देव आत्मेश्वर मंदीर व श्री दामोदर भारती महाराज उपसमिती असून
याबाबत केलेल्या मागणीनंतर मंत्री आदीत्य ठाकरे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, नझीर शेख,सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू, आसिफ शेख आदी उपस्थित होते.