जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य गीतकार संगीतकार कवी अरुण गांगल यांची अप्रतिम भक्तिरचना
विठ्ठला झालो तव दर्शना अधीर
जवळ करा आता,ठेवू नका अंतर।।ध्रु।।
राहिलो एकाकी वारी विना कासावीस
सुख दुःख सांगताना हलके वाटे मनास
नको ताटातूट शरणांगतां आधार।।1।।
चरणी ठेविता माथा,येत गहिवर
नैसर्गिक आपदे राहिलोच दूर
राहुदे तव भेटी साठी मुक्त द्वार।।2।।
सर्वत्र नांदू दे निरामय सुख-शांती
गळा भेट घडू दे सर्व जन वांछिती
तव कृपेने सहन केली हुरहूर।।3।।
तू सर्वांचा मायबाप,कैवारी कृपाळु
भक्तावर करी कृपा,असशी मायाळू
विश्व संकटातून करा दूर सत्वर।।4।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410 201.
Cell.9373811677.
माझी47 गाणी You tube वर”arungangal” या नावाने प्रसारित केली आहेत ऐकून त्याचा आनंद घ्यावा. कविता-गाणी शेअर करण्यास हरकत नाही.