महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली च्या वतीने इयत्ता – पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नवोदय सराव परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक ६ एप्रिल २० २२रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १ .००या कालावधीत मारुती विद्यामंदिर केंद्रशाळा जानवली ता कणकवली या ठिकाणी कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले आहे .तसेच सन 2021 मध्ये कणकवली तालुक्यातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी व नवोदय विद्यालय मध्ये निवड झालेल्या कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2.15 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे . तरी कणकवली तालुक्यातील सन 2022 मध्ये इयत्ता पाचवी च्या नवोदय विद्यालय निवड चाचणी साठी प्रविष्ट विद्यार्थ्यांनी सदर मोफत सराव परीक्षेला बसवावे . त्याकरिता शिक्षक व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवावे . तसेच 2021 मधील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी यांनी आणि नवोदय विद्यालयात निवड झालेल्या कणकवली तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या गुणगौरव कार्यक्रमास विद्यार्थी , पालक, मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी नियोजित स्थळी नियोजित वेळी उपस्थित राहून सहकार्य करावे , असे आव्हान तालुकाध्यक्ष – दशरथ शिंगारे व सचिव श्रीराम विभुते तसेच सर्व कणकवली तालुक्यातील राज्य , जिल्हा , तालुका पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .परीक्षा विभाग प्रमुख म्हणून -श्री मंगेश खांबलकर संपर्क क्रमांक -8637783591 व परीक्षा व्यवस्थापक म्हणून संजय कोळी -संपर्क क्रमांक -9511716217 तर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम करिता नाव नोंदणीसाठी श्रीराम विभुते संपर्क क्रमांक -9405734311व गुरुप्रसाद पाटील संपर्क क्रमांक -9404395325यांच्याशी संपर्क करावा असे कणकवली तालुकाध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे सुचित केले आहे .
शिक्षक भारती शाखा कणकवलीच्या वतीने मोफत नवोदय सराव परीक्षेचे आयोजन
- Post published:मार्च 28, 2022
- Post category:बातम्या / वैभववाडी
- Post comments:0 Comments