इचलकरंजी येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने असंघटीत क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनात वाढ करावी , संरक्षित कायदा व कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ,रद्द केलेले कामगार कायदे पुन्हा लागू करावेत यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवारी काॅम्रेड के.एल.मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आला.यावेळी कामगार विरोधी धोरण राबवणा-या केंद्रातील सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यात आला.तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयास देण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनाचा लाभ देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.तसेच असंघटीत कामगारांना संरक्षित कायदा व कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळत नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.याचाच फायदा उठवत भांडवलदार वर्गाने कामगार वर्गाची आर्थिक पिळवणूक करत एक प्रकारे अन्यायाची कु-हाड चालवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यामुळे या विरोधात आवाज उठवून केंद्रातील मोदी सरकारला जाग आणण्यासाठी आज सोमवारी सर्व कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने असंघटीत क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनात वाढ करावी , संरक्षित कायदा व कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ,रद्द केलेले कामगार कायदे पुन्हा लागू करावेत , यंञमाग कामगारांना घोषित मजुरीवाढ मिळावी
यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवारी काॅम्रेड के.एल.मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.तसेच शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयास सादर करुन याबाबत योग्य निर्णय न झाल्यास भविष्यात लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या निदर्शनामध्ये ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने ,बंडा सातपुते , सुनील बारवाडे , सुभाष कांबळे ,आनंदा गुरव ,सदा मलाबादे , राजेंद्र निकम , शिवाजी भोसले , प्रदीप साहू , रंगराव बोंद्रे , संजय टेके , रियाज जमादार , सदाशिव यादव यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.