बांदा
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक यांच्या वतीने ६मार्च रोजी घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य परीक्षेत बांदा नं १ केंद्रशाळेच्या इयत्ता पाचवीतील कनिष्का राजन केणी हिने ७१ गुण तर कीमया संतोष परब हिने ५० गुण मिळवत प्रज्ञा परीक्षेसठी पात्र ठरल्या आहेत.
तसेच पाचवीतील नेहा विजय शंभरकर व सहावीतील अमोघ राजेश वालावलकर हे दोघे प्रावीण्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.
दरवर्षी गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गणित संबोध ,प्राविण्य व प्रज्ञा या परीक्षा घेण्यात येतात. गणित प्रावीण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची प्रज्ञा परीक्षेसाठी निवड मिळते.
बांदा केंद्रशाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे.डी.पाटील ,सरोज नाईक ,लुईजा गोन्सलवीस ,उर्मिला मोर्ये,रसिका मालवणकर ,रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत,वंंदना शितोळे ,जागृती धुरी,शितल गवस,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा सपंच अक्रम खान ,केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी अभिनंदन करून प्रज्ञा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.