सावंतवाडी
खाजगीकरण नको खाजगीकरण नको आम्हाला आमचा न्याय द्या सरकारी बँकांचे खाजगीकरण नको खाजगीकरण नको अशा घोषणा देत महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेडरेशन सिंधुदुर्ग विभागाचे शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर उतरले सावंतवाडी येथे केंद्र शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणाच्या विरोधात स्टेट बँक ते महाराष्ट्र बँक पर्यंत मोर्चा काढत निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
येथील स्टेट बँक ते गवळी तिठा महाराष्ट्र बँक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी अध्यक्ष संतोष रानडे, सहसचिव लक्ष्मण चौकेकर, प्रसाद धुरी, संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी कोठावळे राजरूप केळुसकर विशाल देसाई श्रीमती शिरसाट लखन गावडे आदी सरकारी अधिकारी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते

