You are currently viewing १९६५ व ७१ च्या भारत-पाक युद्धातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा कणकवलीत झाला सत्कार

१९६५ व ७१ च्या भारत-पाक युद्धातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा कणकवलीत झाला सत्कार

माजी सैनिक संघटना कणकवली शाखेचा उपक्रम

आमदार नितेश राणे, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबाला मोफत दाखविणार “द कश्मीर फाईल्स” चित्रपट

चित्रपट पाहण्यासाठी करण्यात आले नियोजन

कणकवली

देश रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या १९६५ व ७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील जवान आणि त्यांच्या कुटूंबियांचा सत्कार माजी सैनिक संघटना शाखा कणकवली च्या वतीने करण्यात आला.तर यावेळी आमदार नितेश राणे यांच्या मार्फत मोफत दाखविला जाणारा “द कश्मीर फाईल्स” चित्रपट माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय एकत्रीत पाहणार आहेत. रविवारी ३ एप्रिल रोजी हा चित्रपट पाहण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा माजी सैनिक संघटना शाखा कणकवली च्या वतीने माजी सैनिकांचे स्नेहसंमेलन कुटुंबासह आयोजीत करण्यात आले होते. यावेळी १९७१ च्या युध्दात सहभागी असणारे जवान व त्यांच्या परिवाराचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी १९७१ च्या लढाईत शहीद जवान लान्सनायक सदाशिव बाईत ( बलिदानर्थ जनरल सायटेशन) सन्मानित जवानाच्या पत्नी सुलोचना सदाशिव बाईत यांना सत्कार करण्यात आला.तसेच १९६५ व १९७१ च्या युध्दात सहभागी असणारे जवान नायक शांताराम लक्ष्मण तांबे यांच्या पत्नी संगिता शांताराम तांबे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या मार्फत मोफत दाखविला जाणाऱ्या “द कश्मीर फाईल्स” चित्रपट माजी सैनिक कुटूंबासह पाहणार आहेत त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. हा चित्रपट पाहण्यासाठी सहभागी होण्याऱ्यांनी अध्यक्ष श्री. संतोष मुसळे 9423819299,व सचिव दत्तगुरु गावकर 9373921239 यांच्याशी संपर्क साधावा आणि नावनोंदणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अध्यक्ष श्री. संतोष मुसळे उपाध्यक्ष धोंडीराम सावंत व निलेश परब, सचिव दत्तगुरू गावकर,मुख्य सल्लागार श्री रविन्द्र पाताडे तसेच माजी सैनिक दिनकर बाबाजी परब, सुषमा सावंत, सौ रेश्मा देसाई,तारामती पाष्टे, सुलोचना बाईत ऑगस्टीन लोबो, महादेव तावडे,संतोष चव्हाण, मंगेश देसाई ,,सतिष भोसले, सदानंद सावंत,सतीश तांबे, चिन्मयी चित्तरंजन जाधव,समिती तांबे, रश्मी रविंद्र पाताडे,याच्या सह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रहारचे पत्रकार संतोष राऊळ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा