You are currently viewing आ. वैभव नाईक लवकरच मंत्री होतील- खा.विनायक राऊत

आ. वैभव नाईक लवकरच मंत्री होतील- खा.विनायक राऊत

*निवासस्थानी आ.वैभव नाईक यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा*

कणकवली :

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठया उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी आ.वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी उपस्थित राहून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व फेटा घालून आ.वैभव नाईक यांचा भव्य सत्कार केला. आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले असून जनतेचा भक्कम पाठींबा त्यांना असून लवकरच आ.वैभव नाईक मंत्री होतील असा विश्वास खा.विनायक राऊत यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, शिवसेना नेते सतीश सावंत, उद्योजक प्रशांत पोकळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन सावंत, हर्षद गावडे, राजू राठोड, भुषण परुळेकर, रिमेश चव्हाण, पंढरी तावडे, आम. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, भाऊ सतीश नाईक, सुजित जाधव, रुपेश आमडोस्कर, संकेत नाईक, मुरलीधर नाईक, भैया नाईक, बंड्या नाईक यासह संपूर्ण नाईक परिवार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, मित्रमंडळी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा