You are currently viewing जगावेगळे नाते

जगावेगळे नाते

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सायली कुलकर्णी यांची काव्यरचना

घालत होत्या साद मला त्या प्रकाशणाऱ्या वाटा
हिरवी राई, पर्वतरांगा, खळाळणाऱ्या लाटा

वर्षामागुन वर्षे सरली भेट कधीची नाही
विरह तुझा हा जिवास माझ्या अता सोसवत नाही

अखेरीस मग घडून आली भेट मनोहर अपुली
उनाड वारा वनराईशी गट्टी सुंदर जमली

कुशीत येऊन तुझ्या उघडली बंद मनाची दारे
मनात माझ्या वाहू लागले चैतन्याचे वारे

पानफुलांवर मन हे अवखळ मधुर गाणे गाते
अबोल हळवे जगावेगळे तुझे नि माझे नाते

©सायली कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा