अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग व अखिल संघ महिला सेल यांची संयुक्त विशेष सभा शनिवारी जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी प्रकाश दळवी (राज्य सल्लागार), श्रीम विनयश्री पेडणेकर (राज्य कोषाध्यक्ष), म.ल.देसाई, (राज्य संयुक्त चिटणीस) व प्रशांत पारकर (राज्य संघटक) ,श्रीम मृगाली पालव (माजी राष्ट्रीय प्रतिनिधी) यांची प्रमुख उपस्थिती होती
जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष सचिव ,सर्व तालुक्यांचे महिला सेल अध्यक्ष सचिव व मोठ्या संख्येने अखिल संघटक उपस्थित होते. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही विशाल संघटना असून ती जागतीक महासंघाशी जोडलेली एकमेव संघटना आहे . या संघटनेच्या माध्यमातून महिला शिक्षिकांना अनेक लाभ मिळवून दिलेले आहेत . महिलांना नोकरी करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांच्या हक्कासाठी राष्ट्र ,राज्य व तळगाळात झटणारी संघटना असा संघटनेचा नावलौकिक आहे . राष्ट्रीय महिला सेलच्या प्रतिनिधी कै . सुलभाताई दोंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व स्तरावर स्वतंत्र महिला सेल निर्माण करून महिलांसाठी स्वतंत्र हक्काचे व्यासपीठ संघटनेने निर्माण केलेले आहे . त्याचाच एक भाग म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्ग च्या नवीन कार्यकारीणीची निवड या सभेत करण्यात आली.
नवनियुक्त महिला सेल अध्यक्ष सचिव यांनी आपल्या मनोगतातून आपल्याला लाभलेल्या सुवर्णसंधीचा शिक्षक भगिनींसाठी पुरेपुर उपयोग करण्याचा प्रयत्न करू असे विचार व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी जिल्हा महिला सेलचे जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .बरोबरीने काम करीत असताना खेडयापाड्यात सेवा करणाऱ्या आपल्या भगिनींना साथ देणे म्हणजेच संघटनेचे काम आहे . तो वसा आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करू असे आवाहन केले . या कार्यक्रमासाठी राज्य कोषाध्यक्षा श्रीम विनयश्री पेडणेकर,श्रीम .मृगाली पालव , श्रीम .पूनम पालव , श्रीम . श्रावणी सावंत व सर्व तालुका महिला सेल यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे व उपसरचिटणीस भिवा सावंत यांनी केले .
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची नवनियुक्त् जिल्हा कार्यकारिणी अशी;
🌀अध्यक्ष –
श्रीम . संजना ठाकूर .
🌀सरचिटणीस –
श्रीम .सीमा पंडित.
🌀उपसरचिटणीस
श्रीम . गौरी वेर्लेकर .
🌀कार्याध्यक्ष
श्रीम. स्नेहल राजम
🌀कोषाध्यक्ष
श्रीम .स्वाती हिंदळेकर
🌀 उपाध्यक्ष .
श्रीम स्नेहा सावंत
श्रीम . शुभांगी आचरेकर
श्रीम प्रतीक्षा जाधव
श्रीम -श्रुती पालांडे
श्रीम . मयुरी करलकर
श्रीम .मयुरी येरम
श्रीम .अर्चना देसाई
श्रीम अक्षता राणे
🌀संयुक्त चिटणीस
श्रीम .प्रेरणा वारंग
श्रीम .श्रेया परब
श्रीम प्राजक्ता तिरलोटकर
श्रीम मानसी मेस्त्री
श्रीम .वैभवी नाटेकर
श्रीम उमा कासार
श्रीम .संध्या शेळके
श्रीम प्रीतम पारकर
🌀 जिल्हा संघटक
श्रीम समृध्दी म्हाडगुत
श्रीम .ज्योत्स्ना पाटील
श्रीम . रचना गव्हाणकर
श्रीम .संगीता शेळके
श्रीममनीषा ठाकूर
श्रीम .वैष्णवी केळुसकर
श्रीम .रश्मी नेरूरकर
श्रीम शुभेच्छा गवस
श्रीम .दिपाली कळणेकर
श्रीम वासंती झोरे .
श्रीम ऋतुजा गवस
🌀जिल्हा सेल सदस्य
श्रीम .अंकिता बेळेकर
श्रीम दिप्ती जाधव
श्रीम दिपाली सावंत
श्रीम मृणालिनी आचरेकर
श्रीम सुनंदा कवठणकर
श्रीम वर्षाराणी कर्ले .
श्रीम प्राप्ती राणे
श्रीम पूनम कदम .
श्रीम .सारीका सासणे
श्रीम दिपमाला माने .
श्रीम जयश्री यादव
श्रीम विद्याताई पाटील
श्रीम सुप्रिया गोसावी
श्रीम अनिता कांबळी .